जळगाव प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत मॉकपोलची (अभिरुप मतदान) ५० मते डिलीट न केली नाहीत आणि तीन मते अतिरिक्त आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणास जबाबदार धरुन भडगाव येथील मतदान केंद्र क्र.१०७ वरील केंद्राध्यक्ष व एक महिला कर्मचारी अशा दोन जणांना निलंबित करण्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी सांगितली. दरम्यान लोकसभा निवडणुकीत निलंबनाची ही पहिलीच कारवाई बोलले जात आहे. दरम्यान भडगाव येथील मतदान केंद्र क्र.१०७ वर 29 एप्रिल रोजी पुन्हा मतदान घेतले जाणार आहे असे पत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी हे आदेश काढले. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष उद्धवराव बाबूराव पाटील ( सहायक शिक्षक, योगेश्वर माध्यमिक विद्यालय, डांगर बु.ता.अमळनेर) आणि मतदान अधिकारी क्र.३ सुनीता नारायण देवरे (शिक्षिका, लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव) यांचा समावेश आहे.