भडगाव(प्रतिनिधी) – येथील केशवसुत ज्ञानप्रबोधिनीच्या व्याख्यानमालेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त दर महिन्याला एक व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प शिवजयंतीनिमित्त ‘बहुजनांचे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते, लेखक व इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. जाकीर पठाण (जालना) हे गुंफणार आहेत.
व्याख्यान सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतकरी सहकारी संघाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आले आहे. प्रा.एल.जी.कांबळे यांनी आपले वडील स्व.ग्यानोबा लक्ष्मण कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व संभाजी युवराज पाटील यांनी आपले वडील स्व. युवराज गजमल पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रायोजित केले आहे. व्याख्यानाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती द्यावी, असे आवाहन केशवसुत ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष विजयराव देशपांडे, उपाध्यक्ष डाॅ. विलास देशमुख, सचिव प्रा. डॉ. दीपक मराठे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.