
भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्यातील भडगाव मंडळाची नवी तालुका कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, ६३ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीद्वारे संघटन बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. विविध स्तरांवरील नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच ना. गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेने मंडळ अध्यक्ष विनोद नेरकर यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत ८ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ८ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १ प्रसिद्धी प्रमुख, १ सोशल मीडिया प्रमुख आणि ४० सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मंडळ अध्यक्षपदी विनोद देविदास नेरकर (पळसखेडे) यांची नियुक्ती करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून देविदास दौलत पाटील, धर्मेंद्र परदेशी, हंसराज पाटील, शामकांत भोसले, प्रदीप महाजन, शिवदास राजपूत, सुशीलाबाई पाटील आणि रत्नाबाई पाटील यांचा समावेश आहे. सरचिटणीसपदी योगेश पाटील, प्रदीप सोमवंशी आणि किरण शिंपी यांची निवड करण्यात आली आहे.
चिटणीस म्हणून भाऊसाहेब पाटील, निळकंठ खैरनार, शेखर भोसले, प्रदीप सोनवणे, मनोहर चौधरी, जया महाजन, रेखा शिरसाठ आणि मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे. कोषाध्यक्ष म्हणून किरण पाटील, प्रसिद्धी प्रमुख म्हणून शुभम सुराणा आणि सोशल मीडिया प्रमुख म्हणून कुणाल पाटील यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय विविध गावांतील ४० सदस्यांची निवड करून संघटनेला तळागाळात अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यकारिणीत विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, वैशाली सूर्यवंशी, जिल्हा बँक संचालक प्रताप पाटील, जिल्हा सरचिटणीस अमोल पाटील, दूध संघ संचालक पुनम पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.



