मुंबई प्रतिनिधी । एकीकडे दि.1 ऑगस्ट रोजी गुरुवारी सकाळी जुहू बीचवर मोठ्या प्रमाणात ब्ल्यू बॉटल जेलिफिशची दहशत असतांना आज सकाळी जुहू बीचवर ऑईल टार बॉल समुद्राच्या भरतीत वाहून आले. ऑईल टार बॉल हे आकाराने छोटे असून त्याचा खुपच उग्र वास येत असतो.
जुहू बीचवर समुद्राला आलेल्या भरतीमध्ये ऑईल टार बॉल (ऑईलच्या गुठळ्या) मोठ्या प्रमाणात आज सकाळी वाहून आले आहेत. सुमारे 4.5 किमीचा जुहू बीच अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे रोज येथे मॉर्निग वॉकसाठी येणाऱ्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या पर्यटकांना बीचवर चालतांना कसरत करावी लागत होती. गेल्या वर्षी सुद्धा दि, 20 जुलै 2018 ला येथे ऑईल टार बॉल आले होते. मात्र त्यांचा आकार मोठा होता. खोल समुद्रात मोठी मालवाहू व तेलवाहू जहाजे असतात. त्यामधील ऑईल समुद्रात मिसळते आणि मग भरतीत हे काळ्याकुट्ट रंगाचे ऑईल टार बॉल विशेष करून पावसाळ्यात समुद्र किनारी वाहून येतात. तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बीचवर चालताना या ऑईल टार बॉलचा खूप उग्र वास येतो आणि कपड्याला लागल्यास लवकर निघत नाही.