रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । फेब्रुवारी महिना संपत आला असला तरी जानेवारी महिन्याचे मोफत धान्य वाटप बाकी आहे. ह्या रेशन दुकानांवर थेट धान्य पोहोचवणाऱ्या जिल्ह्यातील धान्य वाहतूक व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे लाभार्थी संतापले आहे.
रावेर शहरातील रेशन दुकानांवर जानेवारी महिन्याचे मोफत तर फेब्रुवारी संपत आला तरी रेगुलर व मोफत असे दोन्ही रेशन धान्य अद्याप प्राप्त झाले नाही.मागील दोन वर्षा पासुन कोरोना काळ असल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक गरीब कुटुंब हवालदिल झाला आहे. रेशन दुकानांवर धान्य लवकरात-लवकर पोहचविण्याची मागणी लाभार्थी मधुन होत आहे.
जानेवारीच्या साखरेची लाभार्थांना प्रतीक्षा
रेशन दुकाना मार्फत दिली जाणारी साखर जानेवारी महिन्याची लाभार्थीना मिळाली नसल्याची ओरड होत आहे. आम्हाला जिल्हावरुन साखर मिळाली नसल्याने आम्ही लाभार्थीना दिली नाही मागील वर्षाची ऑक्टोबर, नोहेंबर व डिसेंबर महिन्याची वाटप केली असून फक्त जानेवरी फेब्रूवारी महिन्याची साखर बाकी असल्याचे पुरवठा निरिक्षक अतुल नागरगोजे यांनी सांगितले.