अमळनेर-गजानन पाटील | जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील हे या विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत निवडून येतील की नाही याकडे लक्ष लागून होते.
अमळनेर विधानसभा मतदार संघात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला. अनिल पाटील यांना 33,435 मतांनी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा दुसऱ्यांदा पराभव केला.तर महाविकास आघाडीचे डॉ. अनिल शिंदे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मंत्री अनिल पाटील यांची संपूर्ण मतदार संघात शहर वगळता ग्रामीण भागात एकही प्रचार सभा झाली नाही. यांच्याकडे प्रचारात नियोजन व संघटन होते. पाच वर्ष विकासकामे आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रीय असल्याने त्यांचा विजय निश्चित होता.
शरदचंद्र पवार यांनी मंत्री अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत याची काळजी घेऊ असे सांगितले होते.मात्र ते विधान मंत्री अनिल पाटील यांनी खोडून काढीत आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. अमळनेरच्या निवडणुकीत आघाडी मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. डॉ. अनिल शिंदे यांना अपेक्षित मतदान मिळवण्यात अपयश आले असल्याने अनिल पाटील यांना फायदा झाला.अमळनेर विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांनी एकूण 1,09,445 मतं मिळवली, तर शिरीष चौधरी यांच्यासाठी एकूण 76,010 मत प्राप्त झाली. निवडणुकीत यश मिळाल्यावर अनिल पाटील यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
आमदार पाटील यांना दुसऱ्यांदा इतिहास घडवण्यास सक्षम ठरला आहे.पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत मंत्री अनिल पाटील हे आघाडीवर राहिले.तर माजी आमदार शिरीष चौधरी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.डॉ. अनिल शिंदेनी मोठा जोर लावून महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवली खरी.परंतु कार्यकर्त्यांचे योग्य संघटन नसल्याने त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले.एवढंच नव्हे तर शिंदे यांचा मूळ गावी देखील ते आघाडी घेऊ शकेल नाही. त्यांना केवळ 13798 मतांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीतील संघटन व नियोजन नसल्याने खूपच कमी मते मिळाली.
एकूणच महायुती सरकारने लाडकी बहीण योजना निवडणूक आधी राबवली;दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रु बँक खात्यात येऊ लागल्याने याचा फायदा निवडणूक काळात महायुती सरकारला चांगलाच झाल्याचे दिसून आले.आमचे सरकार जर पुन्हा सत्तेवर आले.तर ही योजना पुढेही सुरू राहील,शिवाय 1500 वरून 2100 रु देण्याचे ठरवले होते. यामुळे लाडक्या बहिणी युती सरकारचा आश्वासनास जागल्या आणि बहिणींनी (अनिल पाटील) भावांना मतांची भरभरून ओवाळणी दिली याची प्रचिती देखील अमळनेर मतदार संघात मतांचा आघाडीतुन दिसून आली.