जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालविणारे येणारे मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी, जळगाव या वसतिगृहात रिक्त जागांवर प्रवेश अर्जाबाबत प्रक्रिया सुरू झालेली आहे.
या वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या जळगाव येथील शैक्षणिक संस्थामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, जळगाव येथील वसतिगृहात सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज वसतिगृहाच्या कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. परिपुर्ण भरलेले अर्ज निकाल लागल्यापासून 15 दिवसांचे आत किंवा 30 जून पर्यंत वसतिगृहात जमा करावेत.
प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम वसतिगृहाच्या कार्यालयात पहावयास मिळतील. वसतिगृहात निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य अभ्यासक्रमाचे पुस्तके इत्यादि सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात. तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे गृहपाल, मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन), जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.