लग्नाआधी हळदीच्या कपड्यांवर नवरदेव पोहचला मतदानाला

chopda1

 

चोपडा (प्रतिनिधी) संपूर्ण तालुक्यात मतदानासाठीचा उत्साह वाढलेला असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे कार्यकर्ते शांततेने पण जोमाने कामाला लागले आहेत. गावातील तरुणांनी उत्साहात मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयन्त सुरू आहेत. दरम्यान, तालुक्यातील चहार्डी येथे गुरुदास अशोक पाटील या नवरदेवाने अंगावरील हळदीसह मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे आज 23 रोजी लग्न आहे. टाळी लागण्या अगोदर त्यांनी मतदान केले.

 

 

परिसरातील गावागावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये कुठलाही वाद झाल्याचे अद्याप समोर आलेले नाहीय. जास्तीजास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतभेद विसरून ते जोमाने काम करत आहेत. तालुक्यातील विटनेर ,वढोदा,वाळकी ,मोहिदा येथे दुपार पर्यंत ५०%च्या आसपास झाले होते. सकाळी बरोबर सात वाजता मतदानाची सुरवात झाली असून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. स्त्री पुरुष वृद्ध तरुण मोठ्या उत्साहात मतदान करत आहेत. दुपारी ऊन होत असल्याने तसेच मजूर वर्गाला कामासाठी शेतात जायचे असल्याचे सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे.

Add Comment

Protected Content