जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील द्वारका नगरात गटारीचे पाणी अंगणात जमा होत असल्याच्या कारणावरून एकाला लोखंडी फावडा आणि लाकडी दांडका डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन दिलीप पाटील वय ४२ रा. द्वारका नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एसटी महामंडळात चालक म्हणून ते नोकरीला आले. सोमवारी २ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या घराजवळील गटारीचे पाणी अंगणात जमा होत असल्याच्या कारणावरून रोडचे काम करणारे सुपरवायझर यांच्याशी नितीन पाटील हे बोलत होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे प्रविण सुर्यवंशी, प्रविश सुर्यवंशी आणि प्रविणचे वडील या तिघांनी घरातून लोखंडी फावडा आणि लाकडी दांडका डोक्यावर टाकून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार प्रविण सुर्यवंशी, प्रविश सुर्यवंशी आणि प्रविणचे वडील (नाव माहित नाही) सर्व रा. द्वारका नगर, जळगाव या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहे.