Home क्राईम रेल्वे स्थानकासमोर काहीही कारण नसतांना दोघांना मारहाण

रेल्वे स्थानकासमोर काहीही कारण नसतांना दोघांना मारहाण


जळगाव प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काहीही कारण नसंताना दोन जणांना मारहाण करून लोखंडी वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यश सुहास चौधरी (वय-२५) रा. दिक्षीत वाडी जळगाव हा तरूण मित्र वैभव सुभाष काळे रा. दिक्षीत वाडी यांच्या सोबत बुधवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शहरातील रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आले. त्याठिकाणी कल्पेश भोईटे आणि प्रशांत गोलू भोईटे (पुर्ण नाव माहित नाही) हे दोघे जवळ येवून काहीही कारण नसतांना यश चौधरी याला बाजूला घेवून चापटा बुक्क्याने बेदम मारहाण केली. यश मारहाण करत असल्याचे पाहून मित्र वैभव काळे हा मदतीला धावून आला. त्याला देखील दोघांना मारहाण केली व लोखंडी वस्तूने दोघांना जखमी केले. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रात्री १० वाजता शहर पोलीसात दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कल्पेश भाईटे आणि प्रशांत भोईटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ओमप्रकाश सोनी करीत आहे.


Protected Content

Play sound