बियरच्या बाटलीच्या पैशांवरून दोघांकडून एकाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भजे गल्लीमधील सुयोग हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन जणांनी एकाला मारहाण व  शिवीगाळ करत हातातील मोबाईल जबरी हिसकावून नेल्याची  घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाबासाहेब किसन गवळी (वय-४१) रा. शनिपेठ गवळीवाडा जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पानटपरी चालवून अपला उदरनिर्वाह करतात. २९ मे रोजी रात्री ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील भजे गल्लीतील हॉटेल सुयोग येथे बियरची बाटली घेण्यासाठी आले होते. हॉटेल सुयोगमध्ये काम करणारा अशोक काळे रा. हुडको आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी बियरच्या बाटलीच्या पैश्यांवरून बाबासाहेब गवळी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. व त्यांच्या हातातील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून घेतला. बाबासाहेब गवळी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणी गुरूवार २ जून रोजी सायंकाळी गवळी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

 

 

Protected Content