पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागेच्या वादावरुन चौघांनी विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारी ३८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील जागेचा वाद सुरू असल्यामुळे ३० एप्रिल रोजी रात्री ८ वाजता गल्लीतील उत्तम फुला बागुल, इंदुबाई उत्तम बागुल, दीपक गौतम बागुल आणि संगीता उत्तम बागुल या चौघांनी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. व विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला आहे. याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहे.