कारण नसतांना तरूणाला लोखंडी पाईपाने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे काहीही कारण नसतांना तरूणाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नशिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद गावातील भवानी नगर हनुमान मंदीराजवळ रोहित अनिल रंधे (वय-२०) हा तरूण आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. सोमवार ६ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास काहीही एक कारण नसतांना गल्लीत राहणारे शंकर प्रल्हाद जोहरे, प्रल्हाद जोहरे, जिजाबाई प्रल्हाद जोहरे आणि लक्ष्मी प्रल्हाद  जोहरे यांनी रोहित रंधे याला काहीही कारण नसतांना लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून जखमी केले होते. आणि शिवीगाळ करून आम्ही तुम्हाला पाहून घेवू अशी धमकी दिली. याबाबत मंगळवार ७ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास रोहित रंधे यांच्या फिर्यादीवरून शंकर प्रल्हाद जोहरे, प्रल्हाद जोहरे, जिजाबाई प्रल्हाद जोहरे आणि लक्ष्मी प्रल्हाद  जोहरे  सर्व रा. भवानी नगर, नशिराबाद  यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहम्मद नूर खान पठाण करीत आहे.

Protected Content