कारण नसतांना तरूणाला बेदम मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डोणगाव येथे काही कारण नसताना तरुणाला दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गणेश विश्वनाथ धनगर रा. डोणगाव धनगर वाडा ता. जि. जळगाव हा तरूण आई लताबाई धनगर यांच्यासह वास्तव्याला आहे. गुरुवार २१ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास काही कारण नसताना गावातील जयंत उर्फ आबा सुभाष धनगर त्याने दारुच्या नशेत घेऊन शिवीगाळ व दमदाटी केली तर त्याच्या तोंडाजवळ आला जोरात मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याबाबत लताबाई धनगर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जयंत उर्फ आबा सुभाष धनगर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

 

Protected Content