भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील माहेर असलेल्या विवाहितेला पिंप्राळा येथील सासरी १ लाखांची मागणी करत शारीरिक मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासरे आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील माहेर आलेल्या ज्योती गणेश कोळी वय 34 यांचा विवाह पिंप्राळा येथील गणेश काशिनाथ कोळी यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. दरम्यान लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेराहून १ लाख रुपये आणावे अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर विवाहितेने पैसे आणले नाही, याचा राग मनात ठेवून पती गणेश काशिनाथ कोळी याने महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू, सासरे आणि नणंद याने देखील शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहित माहेरी कंडारी येथे निघून आल्या. दरम्यान शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता त्यांनी भुसावळ शहर पोलीस तक्रार दिली आहे. त्यानुसार पती गणेश काशिनाथ कोळी, सासू सुशीला काशिनाथ कोळी, सासरे काशिनाथ कुंडलिक कोळी आणि ननंद जया अतुल कोळी सर्व रा. पिंप्राळा जळगाव यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखेरे हे करीत आहे