जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर खर्चासाठी पैसे मागितल्याच्या रागातून विवाहितेला पतीसह सासू यांनी शिवीगाळी करत लोखंडी सळईने डोक्यावर मारून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील श्रीराम चौकातील के.सी.नगर येथे शनिवारी २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता पतीसह सासूवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील श्रीराम चौकात के.सी.नगर येथे विवाहित दिपा कुणाल चव्हाण वया २७ या महिला आपले पती कुणाल सुनिल चव्हाण आणि सासू गिता सुनिल चव्हाण यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शनिवारी २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता विवाहिता घरी असतांना त्यांनी घर खर्चासाठी पती कुणाल चव्हाण यांच्याकडे पैसे मागितले. याचा राग आल्याने विवाहितेला शिवीगाळ करत लोखंडी सळईने डोक्यावर मारून जखमी केले. तसेच जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. जखमी अवस्थेत विवाहितेला शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्री १० वाजता महिलेने शनीपेठ पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार पती कुणाल सुनिल चव्हाण आणि सासू गिता सुनिल चव्हाण या दोघांवर शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम हे करीत आहे.