जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील विठोबा नगरातील माहेर असलेल्या रिना सोहन हळदे (वय-२४) याचा विवाह सोहन अरूण हळदे रा.अडावद ता. चोपडा यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर पती सोहन हळदे यांने विवाहितेला घर बांधण्यासाठी माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने पैसे दिले नाही. याचा राग येवून पती सोहन याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली व धमकी दिली. तर सासू, चुलत सासरे, चुलत दीर व नणंद यांनी देखील गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता मोहरी निघून आल्या. विवाहितेने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पती सोहन अरूण हळदे, सासू ताराबाई अरूण हळदे दोन्ही रा. अडावद ता. चोपडा, चुलत सासरे अनिल बाबुलाल हळदे, चुलत दिर हर्षल अनिल हळदे रा. वरणगाव आणि नणंद नुतन योगेश हळदे रा. अकोट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अर्चना भावसार करीत आहे.