मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | व्हॉटस्ॲप वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची सूचना! सायबर फसवणुकीच्या नवीन प्रकारामुळे अनेकांचे व्हॉटस्ॲप अकाउंट हॅक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे तुमच्या खासगी माहितीवर आणि संपर्कांवर धोक्याची टांगती तलवार आहे.
व्हेरिफिकेशन कोड मिळाल्यास सावधगिरी बाळगा
व्हॉटस्ॲप लॉगिन करताना एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जातो. मात्र, जर तुम्हाला कोणत्याही विनंतीशिवाय हा कोड मिळाला, तर तो अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका.
स्कॅमर कसे फसवतात?
स्कॅमर तुमचा फोन नंबर व्हॉटस्ॲप वर टाकून कोड जनरेट करतात.
ते तुमच्या मित्र किंवा नातेवाईकांच्या नावाने तुम्हाला मेसेज पाठवतात.
“चुकून तुमच्या नंबरवर कोड आला आहे, तो आम्हाला पाठवा” अशी विनंती करतात.
कोड शेअर केल्यास तुमचे अकाउंट हॅक होते आणि तुम्हाला लॉक केले जाते.
हॅकर्सचे पुढील डाव
तुमच्या मित्र आणि नातेवाईकांकडून पैशांची मागणी केली जाते.
व्हॉटस्ॲप चॅटमधील संवेदनशील माहिती चोरली जाते.
तुमच्या ओळखीतल्या इतर व्यक्तींनाही फसवण्याचा प्रयत्न केला जातो.
अशी घ्या खबरदारी
व्हेरिफिकेशन कोड कोणाशीही शेअर करू नका.
व्हॉटस्ॲपचे Two-Step Verification (दुहेरी सुरक्षा) सुरू करा.
अनोळखी मेसेज आणि कॉलला प्रतिसाद देऊ नका.
संशयास्पद संदेश मिळाल्यास तत्काळ व्हॉटस्ॲप सपोर्टला रिपोर्ट करा.