नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनामुळे आधीच अनेक समस्यांचा सामना करावा लागलेल्या भारतीयांसमोर नवं संकट उभे राहिले आहे. परदेशातून भारतात परतलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. या रुग्णाला विलगीकरणासाठी एका रुग्णालयात ठेवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून रुग्णाच्या नमुन्याची चाचणी केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १४ ऑगस्ट २०१४ रोजी मंकीपॉक्सला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. जागतिक उद्रेकाची पहिली घोषणा २०२२ मध्ये करण्यात आली जेव्हा जगभरातून प्रकरणे समोर येऊ लागली.
पीआयबीच्या अहवालानुसार, हे प्रकरण सरकारने जारी केलेल्या गाईडलाइननुसार हाताळले जात आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. मंकीपॉक्सबाबत आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. डब्ल्यूएचओने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केल्यानंतर सरकारने दक्षता सूचना जारी केल्या आहेत. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची वेद्यकीय तपासणी केली जात आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व राज्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.