निळे निशान संघटनेचे अध्यक्ष बाविस्कर यांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व त्यांचे सहकारी यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ ०५ ऑक्टोबर २०२४ पासून निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खाल्लावल्याने आनंद बाविस्कर यांच्या आमरण उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी संघटनेच्या शेकडो संतप्त कार्यकर्त्यानी यावल तहसिलदार कार्यालयावर काढला मोर्चा काढून आपले निवेदन सादर केले.

 

शासन-प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन करून शासकिय कामात आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून शासन – प्रशासनाला दिशाभूल करणारी माहिती देऊन अनु. जाती / जमातिच्या अनेकांना आपल्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवुन जातियद्वेष भावनेने मानसिक त्रास देऊन अन्याय करणाऱ्या गटविकास अधिकारी व त्यांचे सहकारी यांची चौकशी करून करून कारवाई

यावल पंचायत समितिच्या अधिकारी व संबंधितांनी कुठल्या विषयांवर शासन – प्रशासनाची दिशाभुल केली तसेच अनु. जाति /जमातिच्या लोकांवर जाणिव पूर्व अन्याय केला या संदर्भात आम्ही निवेदणात क्रमवारी विषय नमुद केलेले आहेत तरी आपण आम्हाला न्याय देण्याच्या उद्देशाने खालील नमुद विषयांवर विश्वास करून नाहीतर विचार करून योग्य निर्णय घ्यावा
१) भालशिव ग्रा. प. अंतर्गत टेंभीकुरण गांवाच्या नागरिकांकरिता निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळेस आम्ही लेखी स्वरूपात निवेदण दिले व वेळोवेळी आंदोलने केली तरीही गेल्या दोन वर्षात आम्हाला आमच्या निवेदणाचे उत्तर पंचायत समिती यावल यांच्या कडून मिळाले नाही.
२) विभागीय आयुक्त नाशिक यांनी जाहिर केलेल्या सन १९९२ मध्ये अधिसूचने नुसार टेंभीकुरण हे गाव भालशिव ग्रा. प. ला समाविष्ट असून टेंभीकुरण गावातील अनु . जाती / जमातिंच्या लोकांना त्यांच्या मुलभूत हक्कांपासून का वंचित ठेवण्यात येत आहे तसेच दोन वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून ते शालेय शिक्षण कामी व इतर महत्त्वाचा कामांकरिता लागणाऱ्या नोंदी तसेच ग्रामसेवक यांचेकडून गावातील अनु . जाती / जमातिचे लोक ग्रामपंचायत चे कर भरण्यास तयार असतांना ग्रामसेवक यांचेकडून ग्रा.प.कर स्विकारण्यास नकार देण्या संदर्भात चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्यात यावी .
३) जाणीवपुर्वक व्देषभावनेतून दहिगाव – सावखेडा येथिल रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल योजने संदर्भात झालेली अनियमितता व झालेला गैरप्रकार याची चौकशी तसेच गटविकास अधिकारी यांच्या मनमानी मुळे सावखेडा येथील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल लाभापासून वंचित राहिलेल्या अनु . जातिच्या लाभार्थीवर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात चौकशि करून कारवाई करण्यात यावी .
४) आज रोजी गेल्या आठ ते दहा वर्षापासून शासनाच्या नियमांची पायमंल्ली करून तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशाला न जुमानता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे हे मनमानी कारभार करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती यावल येथे तळ ठोकून बसलेले आहेत त्यामुळे सन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे तरी त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करून तात्काळ विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांची यावल पंचायत समिती येथुन बदली करण्यात यावी.

सदरच्या मागण्यांकडे गेल्या दोन वर्षात जाणिवपुर्वक द्वेषभावनेतून टेंभाकुरण गांवातील दलित – आदिवासी समाजावर अन्याय करण्यात आलेला असून तसेच टेंभीकुरण रस्त्याच्या संदर्भात वारंवार पंचायत समिती यावल गटविकास अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांकडून व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासन – प्रशासनाची दिशाभुल केल्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी ही विनंती असे निवेदन महोदया मोहनमाला नाझिरकर यांना देण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे शेकडो महिला – पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content