एसटी वर्कशॉप परिसरातून बॅटरींची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नेरी नाका येथील एसटी वर्कशॉपच्या आवारातून तीन बॅटरीज् अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नेरी नाक्याजवळील एसटी वर्कशॉप येथे शनिवारी २१ मे रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार ५०० रुपये किंमतीच्या तीन बॅटरी चोरून नेले. हा प्रकार  २२ मे रोजी सकाळी ८ वाजता एसटी कर्मचारी विनीत विजयकुमार कुलकर्णी (वय-३४) रा. रामदेव बाबा मंदिराजवळ, भुसावळ जि.जळगाव यांच्या लक्षात आला. त्यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिसरात बॅटरीचा शोध घेतला. काहीही माहिती मिळाली नाही. अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. विजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनारा करीत आहे.

 

 

Protected Content