बापरे .. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून धारदार सुऱ्याने वार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तीन जणांनी धारदार सुऱ्याने तरूणावर वार करून जखमी करत खिश्यातील ५ हजार ६०० रूपयांची रोकड जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शिवाजी नगर हुडको परिसरात घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, महेंद्र नामदेव बडगुजर (वय-२०) रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजी नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता महेंद्र बडगुजर हा त्याचा मित्र सनी मनोज जाधव हे दोघेजण शिवाजी नगर हुडको परिसरातील चहाच्या टपरीवरून चहा पित असतांना त्याठिकाणी गुफरान सोबत तनवीर उर्फ तन्या आणि लढ्ढा (तिघांचे पुर्ण नाव माहित नाही) हे तिथे आले. त्यावेळी तिघांनी महेंद्रकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

त्यावर महेंद्रने पैसे दिले नाही म्हणून तिघांनी हातातील धारदार सुराने डोक्यावर वार करून जखमी केले. तसेच तिघांनी महेंद्रच्या खिश्यातील ५ हजार ६०० रूपये बळजबरी हिसकावून चोरून नेले. हा प्रकार घडल्यानंतर महेंद्र बडगुजर याने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता तिघांविरोधा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content