बापरे… कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लांबविले

रावेर प्रतिनिधी । कोयत्याचा धाक दाखवून दोन महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार ऐनपुर ते खिर्डी रोड येथे घडला. याप्रकरणी अज्ञात धोरणाच्या विरोधात निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगीताबाई विजय पाटील (वय-४१) आणि मीराबाई श्रीराम पाटील दोन्ही रा. ऐणपूर ता. रावेर या दोन्ही महिला १ जानेवारी रोजी सकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान या ऐनपूर ते खिर्डी रोड दरम्यान किशोर भगवान पाटील यांच्या रस्त्यावरील गोडाऊन जवळ केळीच्या पिकाजवळून जात होत्या. त्यावेळी अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील एक तरुण हातात कोयता घेऊन दोघा महिलांचा रस्ता आडविला. त्याने कोयत्याचा धाक दाखवून दोन्ही महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा एकूण ६३ हजार २०० रुपये किंमतीचे दागीने जबरी हिसकावून चोरून लंपास केले आहे. या घटनेमुळे ऐणपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात संगीता पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे करीत आहे.

 

Protected Content