अमळनेर (प्रतिनिधी) नोकरी करताना आयुष्याची 35 ते 40 वर्षे जेव्हा मनुष्य एखाद्या विभागाला सेवा देत सेवानिवृत्ती होतो. तेव्हा त्याचा सेवाभावी वृत्तीचा आलेख लक्षात ठेवण्यासारखा असतो. विजय धनगर सारखी ध्येयवेडी माणसे बघितली की याची आपल्याला जाणीव होते, अशा शब्दात बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी विजय धनगर यांचा गौरव केला. श्री. धनगर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात अध्यक्षीय भाषणातुन बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा प्रबंधक आर.ए. कुलकर्णी यांनी केले.
यावेळी शाखा प्रबंधक श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले की, शहरातील व तालुक्यातील असंख्य शेतकरी आणि सामान्य वर्गाला नेहमी मदत व सहकार्य आणि प्रोत्साहन दिले आहे. ग्राहकांच्या हिताचा विचार करणारा सामाजिक भान असलेला आपण समाजाचे देणे लागतो, याचे भान ठेवून बँकेचे हित जोपासण्याचे काम त्यांनी त्यांच्या काळात केले. यावेळी व्यासपीठावर पी.बी.जैन,सत्कारमुर्ती विजय धनगर,सहपत्निक होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक पी.बी.जैन यांनी केले.बँक आँफ महाराष्ट्र शाखेचे प्रबंधक व सर्व कर्मचारी यांच्या वतीने सत्कारमुर्ती विजय धनगर यांचा सहपत्निक शाल,श्रीफळ,भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अनेक खातेदारांनी त्यांचा चांगल्या सेवेबद्दल सत्कार केला. विजय धनगर यांनी अमळनेर बँक आँफ महाराष्ट्र शाखेत ३५ वर्ष तर धुळे येथे तीन वर्षे, पारोळा तीन महीने उत्कृष्ट सेवा दिली आहे. यावेळी एस.बी.सोनार, प्रा.एब.बी.चव्हाण, प्रविण देशमुख, शशिकांत गोसावी, प्रा.एल.एल.मोमाया, सचीनकुमार यांनी सांगितले कि विजय धनगर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक खातेदार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद वानखेडे, सचीनकुमार, गुरप्रितकोर, निर्मल भामरे, ए.व्हि. कोतवाल, नितीन पाठक, शशिकांत लांडगे, सचिन पाटील, अशोक पवार, प्रियदर्शनी भोसले, कलिम पिंजारी यांनी प्रयत्न केले. शेवटी आभार जैन सरांनी मानले.