रावेर शहरात बांग्लादेशातील हल्ल्याचा निषेध; बाजारपेठ कडकडीत बंद

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत कडकडीत बंद पाळण्यात आला. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. तसेच आजचा बाजारही रद्द करण्यात आला आहे.

या बंदमुळे स्थानिक जनजीवनावर परिणाम झाला असून, शहरातील आठवडे बाजारही रद्द करण्यात आला आहे. रावेरमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हल्ल्याचा निषेध केला आणि बंदमध्ये सहभाग नोंदवला. बांगलादेशात घडलेल्या या निषेध करण्यात येत असून रावेर शहरावर पोलीस पोलिसांची नजर आहे.धार्मिक सौहार्द आणि शांतता टिकवण्यासाठी स्थानिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन शहरातील नेत्यांनी केले आहे. बंद शांततेत पार पडल आहे.पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी शहरावर लक्ष ठेवून असून तहसीलदार बंडू कापसे यांनी देखिल शहरातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली आहे.

Protected Content