Home Cities जामनेर बांग्‍लादेशातील हिंसाचाराच्या निषेधार्थ पहूरमध्ये बंदला सुरुवात

बांग्‍लादेशातील हिंसाचाराच्या निषेधार्थ पहूरमध्ये बंदला सुरुवात


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बांगलादेशात झालेल्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या धार्मिक हिंसाचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला आज शुक्रवारी ( ता . १६ ) सुरुवात झाली असून यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदुस्तान प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, शहर पत्रकार संघटना, व्यापारी वर्ग यांच्यासह विविध संघटना सहभागी झालेल्या आहेत .

सकाळी ७ वाजेपासून बंदला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दादासाहेब डॉ. कॅप्टन एम. आर. लेले पहूर बस स्थानक येथे सर्व नागरिकांनी बांगलादेशातील अमानवी हिंसाचाराचा निषेध केला. पहूर शहर पत्रकार संघटनेने स्वाक्षरी मोहिमेद्वारे या घटनेचा निषेध केला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत बंदचे आयोजन करण्यात आले.पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून नागरिकांचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound