जळगाव प्रतिनिधी । मोहंमद द मॅसेंजर ऑफ गॉड या डिजीटल मंचासाठी तयार करण्यात आलेल्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी येथील मुस्लीम समुदायाने निवेदनाद्वारे केली आहे.
मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड या नावाचा चित्रपट नुकताच डिजिटल मंचासाठी तयार करण्यात आला आहे. लवकरच याचे प्रसारण होत असल्याने त्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी या बाबतचे निवेदन पंतप्रधान व केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले. हे निवेदन गृह विभागाचे डेप्युटी चिटणीस रवींद्र मोरे यांनी स्वीकारले व त्वरित ते शासनास पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी राज्य राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांच्यासह मुस्लिम पर्सनल लाँ चे शहर-ए-काझी मुफ्ती अतिकुर रहेमान, मानियार बिरदारीचे प्रदेशाध्यक्ष फारूक शेख,राष्ट्रवादि पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख सलीम इनामदार, महानगर अध्यक्ष डॉ रिझवान खाटीक व मुस्लिम ईदगाह ट्रस्ट चे सह सचिव अनिस शाह उपस्थित होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही केंद्रीय मानव संसाधन मंत्रालय ला एक पत्र पाठवून केंद्राला या प्रदर्शित होणार्या चित्रपटा मुळे भावना दुखावली जाणार आहे म्हणून यावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. यामुळे केंद्र सरकारने यावर बंदीचा निर्णय घेण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.