यावल प्रतिनीधी । तालुक्यातील सुना सावखेडा हनुमानजी बामणोद येथे तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत विकासकामांचे भुमीपूजन करण्यात आले.
जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या निधीतून गावाचे स्वागतद्वार आणी पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन स्वामी जगतप्रसादजी व माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बामणोद ग्रामपंचायत माजी सरपंच शिवराम तायडे, माजी पंचायत समिती सदस्य विलास शिवराम तायडे, प्रल्हाद केदारे, प्रमोद बोरोले, रमेश मेंबर, रईस शेठ,नितीन झांबरे, कैलासशेठ, राहुल तायडे, बळीराम सोनवणे, मनोहर सोनवणे,रमेश सोनवणे, मुकेश बडूगे, नवल वारंगे, चेतन येवले, हाजी तौफिक, तुषार सोनवणे, सचिन सोनवणे, अक्षय सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.