जळगाव प्रतिनिधी । येथील बालनिकेतन विद्यामंदिर विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शरीरासाठी योगा हा अत्यंत महत्वाचा असून तो नियमित करण्यात यावा. तसेच योगशिक्षक पूनम बागल, ज्योत्स्ना दांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष योगा करून दाखवला व विद्यार्थ्यांना योगा महत्त्वाचा आहे हे देखील सांगण्यात आले. यावेळी शाळेतील इतर शिक्षक-शिक्षकेतर व कर्मचारी तसेच विद्यार्थीं मोठया संख्येने उपस्थित होते.