जळगाव प्रतिनिधी । मु.जे. महाविद्यालयातील सोहम् डीपार्टमेंट ऑफ नँचरोपँथी व योग विभागातर्फे शहरातील बालनिकेतन विद्यामंदीर व माध्यमिक शाळेत योग शिबीराचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी योग विभागाच्या प्रा. गितांजली भंगाळे, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ओंकाराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांना 23 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या १० दिवस दरम्यान दररोज विद्यार्थ्यांकडून प्राणायाम व ओंकार यांचा सराव केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती मध्ये वाढ होण्यास साहाय्य होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता सुध्दा वाढणार आहे. असे अनेक फायदे सदर शिबीराचे असल्याचे प्राचार्या गितांजली भंगाळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. सदरील शिबीराचे योगाभ्यास मार्गदर्शन योग विभागाच्या विद्यार्थीनी जोत्स्ना दांडगे, पुनम बागल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या शिबीराच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षिका संगिता निकम व सुवर्णा सोनार यांनी परीश्रम घेत आहे.