जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठेत तीन मजली इमारतीच्या खालच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघकीस आली.
याबाबत माहिती अशी की, योगेश काशीनाथ पवार (वय-४४) रा. बळीराम पेठ यांचे तीन मजली इमारत आहे. ते जिल्हा न्यायालयात नोकरीस आहे. रात्री उशीरापर्यंत जेवण करून तिसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. त्यावेळी खालच्या घराचा दरवाजा बंद केला होता. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खालच्या घराचा दरवाज टॉमीने तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट फोडले. कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या, ५ ग्रॅम सोन्याचा तुकडा, दोन चांदीच्या मुर्त्या आणि ७ ते ८ हजार रूपयांची रोकड असा एकुण लाखो रूपयांचा मुद्देमाल लंपास केली. यावेळी कपाटातील सर्व समान अस्तव्यस्त केला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.