फैजपूर (प्रतिनिधी) लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या 9 व्या पुण्यतिथीनिमित्त लोकसेवक मधूकराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय परिसरात आज संत महंतांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याआधी लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, सातपुडा हिरवागार करावा, हे बाळासाहेबांचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचे प्रतिपादन, माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केले आहे.
लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या ९ व्या पुण्यतिथीनिमित्त आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी मा.आ.शिरीष चौधरी हे बोलत होते. लोकसेवक बाळासाहेबांचे सातपुडा हिरवागार करण्याचे स्वप्न होते. याबाबत त्यांनी कामाला सुरुवात देखील केली होती. परंतू ज्या दिवशी बाळासाहेबांनी वृक्षारोपण केले. दुर्देवाने त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे दुःखद निधन झाले. आता ती जबाबदारी माजी आमदार शिरीष चौधरी पार पाडत आहे. त्यानुसार प्रत्येक गावात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यापैकी एक कार्यक्रम आज लोकसेवक बाळासाहेब तथा मधुकरराव चौधरी यांच्या 9 व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून लोकसेवक मधूकराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय परिसरात संत महंतांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याआधी लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, शास्त्री भक्ती स्वरूप दासजी, शास्त्री सुरेशराव मानेकर बाबा, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते प्रभाकर सोनवणे, यावल नगरसेवक मुकेश येवले, भगतसिंग पाटील, तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष डॉ एस के चौधरी, सचिव, प्राध्यापक एम टी फिरके, व्हा चेअरमन प्रा. ए. एस. के. चौधरी, प्राध्यापक पी. एच. राणे, जनता शिक्षण मंडळ सचिव प्रभात चौधरी, सातपुडा विकास मंडळ पाल सचिव अजित पाटील, लोहारा मुख्याध्यापक सुधाकर झोपे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, प्राचार्य डॉ. एल. चौधरी,दिनुनाना पाटील, मसाकाचे माजी संचालक बारसु नेहते, कादिल खान, शेख रियाज यासह यावल रावेर तालुक्यतील कार्यकर्ते, शिक्षक शिक्षकतेर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.