धरणगाव (प्रतिनिधी) कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर नुकताच त्यांचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला.
बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी जळगाव काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सचिव डी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, अविनाश भालेराव, रतिलाल चौधरी, प्रभात चौधरी आदी उपस्थित होते.