पहूर ता.जामनेर (वार्ताहर) येथील मुस्लीम बांधवांतर्फे आज सकाळी इदगा मैदानात नमाज पठण करून बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, पत्रकार गणेश पांढरे, रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे,अॅड. संजय पाटील, सचिन कुमावत,उपसरपंच योगेश भडांगे, राजू जाधव, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, प्रवीण देशमुख, जितेंद्र परदेशी, ईश्वर देशमुख, अनिल देवरे, आदी पोलिस कर्मचारी व शांतता कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.