Home Cities यावल विरावली विकासोच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड

विरावली विकासोच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील विरावली येथील रहिवासी बाजीराव माणिकराव पाटील यांची विरावली विकास सोसायटीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. यावल येथील दुय्यम निबंध कार्यालयाचे अधिकारी के. वी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमनपदाची निवडणूक पार पडली.

 

या निवडणुकीत  बाजीराव माणिकराव पाटील यांची संचालक मंडळाने सर्वानुमते  निवड करण्यात आली आहे. या चेअरमनपदी पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सहकारी माजी विकासो चेअरमन अर्जुन पाटील, व्हा.चेअरमन नरेंद्र सोनवणे, संचालक  युवराज पाटील, लीलाधर कोळी, नावरे येथील रमेश पाटील, संजय मोतीराम पाटील, गुलाब पाटील, प्रल्हाद पाटील,  कोकिळा पाटील, उषा महाजन , प्रमिला पाटील आदी संचालक मंडळ यांनी नवनिर्वाचित चेअरमन यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या. निवड झाल्यानंतर विरावली गावात फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राकेश कोलते, देवकांत पाटील , विकासोचे सचिव प्रमोद सुरवाडे आदीनी स्वागत केले .


Protected Content

Play sound