Home क्राईम युक्रेनमध्ये एमबीबीएस प्रवेशाचे आमिष: डॉक्टरला लावला ७ लाख ३० हजारांचा चूना

युक्रेनमध्ये एमबीबीएस प्रवेशाचे आमिष: डॉक्टरला लावला ७ लाख ३० हजारांचा चूना


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युक्रेनमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरांची ७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात फत्तेपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील बाबू चव्हाण (वय ५२, रा. कापूस वाडी, ता. जामनेर) हे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांच्या मुलाला युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन महेश शांताराम वाघमारे (रा. मुंबई), राहुल शर्मा आणि प्रेरणा कौशिक (रा. दिल्ली) या तिघांनी दिले होते. या तिघांनी संगनमत करून सुनील चव्हाण यांच्याकडून एकूण ७ लाख ३० हजार रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनील चव्हाण यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound