जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या अरूण सोनवणे खून प्रकरणात अटकेतील तिघा संशयित आरोपींचा जामीन अर्ज जळगाव व जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी १४ जून रोजी दुपारी ४ वाजता फेटाळून लावला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील समता नगर येथील अरुण बळीराम सोनवणे या तरूणाची १० डिसेंबर २०२३ रोजी जुन्या वादातून चॉपरने निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी कुलदीप उर्फ सोनू पोपट आढाळे, पप्पू आढाळे, बळीराम चव्हाण, प्रवीण उर्फ दोध्या शिरसाठ, अशोक महादू राठोड हे जिल्हा कारागृहात बंदी आहेत. यातील बळीराम उर्फ बलराम चव्हाण, अशोक महादू राठोड, प्रवीण उर्फ दोध्या शिरसाठ, सर्व तिघे रा. जळगाव या तिघांनी जिल्हा सत्र नायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी १४ जून रोजी दुपारी ४ वाजता जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात कामकाज झाले. यात सदर तिघा आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यात फिर्यादीतर्फे ॲड. सागर चित्रे, सहाय्यक ॲड. सुरेश महाजन, तर सरकार पक्षातर्फे ॲड. सुरेंद्र काबरा यांनी न्यायालयात काम पहिले.