बहिणाबाई विद्यापीठात गणित विभागातर्फे विविध कार्यक्रम

nmu new name

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित विभागातर्फे गणित दिवासानिमित्त १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२२ डिसेंबर रोजी गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्म दिन राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. गणित दिवासानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाचे उद्घाटन १९ डिसेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य के.बी.पाटील यांच्या हस्ते जे.डी.बेडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.एस.राणे हे होते. यावेळी उपप्राचार्य रत्ना महाजन, गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.एस.आर.चौधरी, गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा. किशोर पवार, प्रा. हरिभाऊ तिडके, प्रा.पी.पी.तायडे, प्रा.चिंतामण आगे उपस्थित होते. प्राचार्य के.बी.पाटील यांनी गणित हा विषय पाठांतराचा नसून तो आकलन करण्याचा आहे. गणित विषयाचा अभ्यास हा चिकित्सक पध्दतीने केला पाहिजे असे सांगत गणितमुळे तंत्रज्ञानात कशी प्रगती झाली याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. चौधरी यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवन परिचय करुन दिली. प्रास्ताविक प्रा.किशोर पवार यांनी केले. प्रा.पी.एन.भिरुड यांनी आभार मानले. १९ डिसेंबर रोजी २५ विद्यालय व महाविद्यालयांमध्ये वस्तुनिष्ठ चाचणी आयोजित करण्यात आली होती.

४८७ विद्यार्थ्यांचा सहभाग
या ऑनलाईन चाचणी परीक्षेत ४८७ विद्यार्थ्यांचा सहभागी झाले होते. यापैकी १२७ विद्यार्थी पुढील चाचणीसाठी पात्र झाले. २२ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या गणित विभागात सावित्राबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील गणित विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा.कात्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून वस्तुनिष्ठ चाचणी, भित्तीपत्रक स्पर्धा व विषय सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Protected Content