पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अशातच बच्चू कडू यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर बच्चू कडू महाविकाससोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र मी कुणावरही नाराज नाही.
शेतकरी, मजूर, अंपगांच्या प्रश्नाबाबत शरद पवार यांची भेट घेतल्याचं बच्चू कडू यांनी म्हटले. शरद पवार यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी म्हटले की, “आजची भेट आधीच ठरली होती. काही मुद्द्यावर चर्चा करायची होती. शेतकरी, मजुरांचे, अंपगांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला १ सप्टेंबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय घेईल.”