जळगाव प्रतिनिधी । येथील कै. बी.एम. जैन विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन गुलाब पुष्पांसह त्यांचे स्वागत करण्यात आले.
पूर्व खान्देश हिंदी सेवा शिक्षण मंडळ संचलीत कै. सेठ बी.एम. जैन विद्यालय आजपासून सुरू झाले असून आज विद्यार्थ्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. संस्थेचे सहसचीव विवेक बंगाली. मुख्याध्यापक भास्कर फुलपगार यांच्यासह सुनीता फुलपगार, कल्पना देवराज यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.