धरणगाव प्रतिनिधी । अनोरे येथील बी.जे. महाजन विद्यालयात आज दि. 5 सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यावेळी शिक्षक दिन म्हणून विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळेस इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः वर्गणी गोळा करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रुमाल-टोपी-श्रीफळ-गुलाबपुष्प देऊन सर्व शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी बी.आर.महाजन यांनी सांगितले की, शिक्षक दिवस 5 सप्टेंबर 1988 पासून सुरू करण्यात आला. त्याचबरोबर भारतातच नव्हे तर इतर अकरा देशांमध्ये हा शिक्षक दिवस साजरा करण्यात येतो. तसेच राधाकृष्णन यांच्या जीवनावरील काही महत्त्वाचे गोष्टी सांगितल्या. यावेळी कार्यक्रमात मुख्याध्यापक एम.एच. चौधरी, ए.के.पाटील, आर.बी.महाले, के.ए.वारुळे, किरण महाजन, बी.डी.सुतार, पी.एन.माळी यांच्यासह आदि कर्मचारी उपस्थित होते.