जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बी.ए. मानसशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बापूसाहेब शहाजीराव त्र्यंबकराव साळुंखे यांच्या स्मरणार्थ सुवर्णपदक दिले जाणार असून या सुवर्णपदकासाठी प्रा.डी.पी.पवार व प्रतिभा पवार यांनी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्याकडे दोन लाख रुपये निधीचा धनादेश सुपूर्द केला.
एन.मुक्टोचे माजी सरचिटणीस व माजी केंद्रीय उपाध्यक्ष प्रा.डी.पी.पवार यांनी त्यांचे सासरे बापूसाहेब शहाजीराव त्र्यंबकराव साळुंखे मु.पो.खेडगाव ता.चाळीसगाव यांच्या स्मरणार्थ हे सुवर्णपदक सुरु केले आहे. बी.ए. मानसशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस हे सुवर्णपदक दिले जाणार आहे. हा धनादेश कुलगुरुंकडे सुपूर्द करतांना सौ.प्रतिभा पवार, हेमंतकुमार साळुंखे, केतन पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल, माजी अधिसभा सदस्य प्रा.अनिल पाटील, प्रा.एकनाथ नेहेते, प्रा.नितीन बावीस्कर हे उपस्थित होते.