चोपडा प्रतिनिधी । येथील सकल दिगंबर जैन समाजातर्फे आयुर्वेद चिकित्सा शिबिराचे आयोजन श्री विद्यासागर संत निवास येथे करण्यात आले असून याला उत्तम प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उदघाटन जळगाव येथील प्रसिद्ध वैद्य महेश बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरास वैद्य अंकुश संघवी (आयुर्वेदाचार्य) कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरास संत शिरोमणी १०८ आचार्य श्री विद्यासागरजी मुनीमहाराज यांचे परम प्रभावक शिष्य प पू १०८ मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी आपल्या उदबोधनात सांगितले की आयुर्वेद हे भगवान आदिनाथांपासून चालत आलेले आहे. त्यांनी आपली दिनचर्या कशी हवी या बाबतीत मार्गदर्शन केल्यानंतर शिबिरास सुरुवात झाली. प.पु. मुनीश्री १०८ नेमीसागरजी महाराज व प.पु. १०५ रत्न समताभूषणजी महाराज यांचे सानिध्यात घेण्यात आलेल्या शिबिराचा सुमारे ४०० रुग्णांनी लाभ घेतला. यात रुग्णांना तपासणी व औषधोपचार मोफत ठेवण्यात आलेले होते. रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधीचे वाटप करण्यात आले. यात चिकित्सक म्हणून वैद्य महेश बिर्ला जळगाव, वैद्य अंकुश संघवी कोल्हापूर, वैद्य किरण महाजन चोपडा, वैद्य गौरव जैन धुळे, वैद्य रेणुका राजे जळगाव, वैद्य अनुपम जैन चोपडा, वैद्य विशाल जैन चोपडा, वैद्य सिमा जैन चोपडा व वैद्य निकिता दोषी अकोट यांनी सेवा दिली.
या शिबिरास मोठ्या संख्येने रुग्णांनी उपस्थिती देऊन लाभ घेतला. यशस्वीतेसाठी राहुल रसिकलाल जैन, सीए तेजस जैन, रोशन जैन, सागर जैन, राजस जैन, सौरभ जैन, तेजस राजेंद्र जैन, केतन जैन, हिमांशू जैन, तनिष्क जैन, मैथिली जैन, अंकिता जैन, सायली जैन, प्रियांका जैन, साक्षी जैन व राहुल सुभाष जैन आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राहुल रसिकलाल जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन सीए तेजस जैन यांनी केले.