अयोध्या । अयोध्या येथील नियोजीत भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. जगभरातील कोट्यवधी आबालवृध्दांनी हा क्षण याची देही-याची डोळा अनुभवला.
राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला १७५ जण हजर होते.
अयोध्येत पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी भूमिपूजन केलं. त्यांनी एकूण ९ शिळांचं पूजन केलं. यावेळी कूर्म शिळा मध्यभागी ठेवण्यात आली होती. याच शिळेवर रामलला विराजमान होणार आहेत. ‘१९८९ मध्ये जगभरातल्या भाविकांनी मंदिरासाठी विटा पाठवल्या होत्या. अशा २ लाख ७५ हजार विटा अयोध्येत आहेत. त्यातल्या १०० विटांवर जय श्रीराम लिहिण्यात आलं आहे. त्यातल्याच ९ विटा आज इथे आणण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती पुजाऱ्यांनी भूमिपूजन सुरू असताना दिली.