नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अयोध्या राम मंदिर प्रकरणात १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गनोगोई यांनी दिले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये याप्रकरणी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले असल्या कारणाने, देशातील अत्यंत संवेदनशील विषय मानल्या जाणाऱ्या अयोध्या प्रकरणातील निकाल नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी निर्णय येण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी रोज एक तास अतिरिक्त देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच गरज असेल तर शनिवारीही सुनावणी करु शकतो असे सांगितले आहे.