Home न्याय-निवाडा अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल


ayodhya case
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जमियत उलेमा ए हिंदने अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात फेरविचार याचिका दाखल केली आहे.

 

जमियतचे प्रमुख मौलाना अर्शद मदानी यांनी सांगितले की, बहुसंख्य मुस्लिम हे फेरविचार याचिका दाखल करावी, या मताशी सहमत होते. तसेच न्यायालयानेच आम्हाला फेरविचार याचिका दाखल करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जमियत प्रमाणेच अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळही लवकरच फेरविचार याचिका दाखल करणार आहोत. आम्ही आजच फेरविचार याचिका दाखल करणार नाही. आम्ही आमची फेरविचार याचिका तयार केली आहे. ९ डिसेंबरपूर्वी आम्ही केव्हाही याचिका दाखल करु असे अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाचे जफरयाब जिलानी यांनी सांगितले.


Protected Content

Play sound