जळगाव प्रतिनिधी । डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातील विद्यार्थींनी आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्लॉस्टिक मुक्त भारत संकल्पनेवर आधारित ‘प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा’ या पथनाट्याव्दारे शहरातील विविध भागात जनजागृती करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘प्लॉस्टिक हटवा पर्यावरण वाचवा’ हे पथनाट्य फुले मार्केट, सुभाष चौक आणि भवानी मंदिर परिसरसह आदि भागामध्ये सादर केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून प्लॉस्टिकचा वापर करणार नाही असे प्रतिज्ञा म्हणून घेतली. पथनाट्यचे लेखन संध्या काटोले व प्रमोद इसे यांनी तर दिग्दर्शन प्रमोद इसे यांनी केले. तुषार पुराणिक यांनी संगीत साथ दिली. जळगाव मनपा आयुक्त उदय टेकडे, विवेकानंद प्रतिष्ठान शाळेच्या कोषा हेमा अमलकर, मुख्याध्यापिका योगिता शिंपी आणि इतर मनपा अधिकारी यांच्यासह पूजा साळवी, वंदना सावदेकर, योगेश जोशी आणि अक्षय येवले यांच्या इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.