Home आरोग्य आडगाव येथे ‘टीबी मुक्त भारत’ अभियायानातून जनजागृतीचा संदेश

आडगाव येथे ‘टीबी मुक्त भारत’ अभियायानातून जनजागृतीचा संदेश


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र आडगाव येथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल पाटील आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना निकम, डॉ. तरन्नुम शेख आणि सरपंच सौ. अमीना रशीद तडवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती केली आणि नागरिकांना या आजाराच्या लवकर निदान व उपचाराचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आरोग्य तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शनही केले.

या अभियानात उपकेंद्र आडगाव अंतर्गत गावांमधील एकूण ७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली, २१ एक्स-रे तपासण्या घेण्यात आल्या तसेच १९ रुग्णांना सीवायटीबी लस देण्यात आली. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत सजगता आणि आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

कार्यक्रमाला सरपंच सौ. अमीना तडवी, सदस्य रशीद तडवी, बबलू न्हावी, डॉ. दर्शना निकम, डॉ. तरन्नुम शेख, डॉ. वकार शेख, डॉ. सोनल भंगाळे, डॉ. अशफाक शेख, डॉ. मोहसिन कुरेशी आणि डॉ. धनंजय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी क्षयरोग निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे नमूद केले.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी एलएचव्ही सौ. सरला चौधरी, एचए दीक्षांत प्रधान, आरोग्य सेविका सौ. शीला जमरा, आरोग्य सेवक पवन काळे (पाटील), जयेश माळी, मनोज बारेला, उमर रझा, मुजाहिद तडवी, सरदार कानाशा, डीईओ मुस्तफा तडवी, औषध निर्माण अधिकारी पिंटू तडवी, क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे, मिलिंद राणे आणि आशा स्वयंसेविका मनिषा पाटील, शाहीन तडवी, आशा तडवी, कुरशात तडवी, मंगला बारेला, सौ. सायरा तडवी, संगीता बारेला, मदतनीस आशा कोळी आणि वाहन चालक कुर्बान तडवी यांनी मेहनत घेतली.

या उपक्रमामुळे आडगाव परिसरात आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचला असून, “टीबी मुक्त भारत” या उद्दिष्टाकडे एक पाऊल पुढे टाकले गेले आहे. या अभियानामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता आणि प्रतिबंधात्मक वैद्यकीय संस्कृती दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound