रावेर येथे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने बाबत जागृती अभियान

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तहसील कार्यालयात महसूल पंधरवाडा अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे जागृती अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार बंडू कापसे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री क्षेत्र ओंकारेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. एस. आर. पाटील आणि नायब तहसीलदार संजय तायडे उपस्थित होते.

यावेळी जिल्हा जेष्ठ नागरिक संघ समन्वयक एस. बी. महाजन, मानकरे गुरुजी, ॲड विजय महाजन, डॉ. रवींद्र वानखेडे, डॉ. सुरेश पाटील, पी. टी. महाजन, जगन्नाथ शामू महाजन, एन. आर. पाटील आणि एकनाथ पाटील यांनीही सहभाग घेतला. तीर्थ दर्शन योजना आणि वयोश्री योजनेच्या शासन निर्णयाचे वाचन मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाधिकारी यासीन तडवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन पाटील, स्वप्नील परदेशी, भूषण कांबळे, सलीम तडवी आणि संतोष पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कार्यक्रमामुळे जेष्ठ नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळाली आणि त्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या उपक्रमांची जागृती झाली.

Protected Content