एरंडोल प्रतिनिधी । कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या जितेंद्र पाटील यांना स्व. लोकनेते पप्पु गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान चाळीसगाव यांच्यातर्फे कोरोना योध्दा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आजपर्यंतच्या मानवी इतिहासात अनेक शूर योध्यांनी शत्रूशी मुकाबला केला, परंतु अलीकडेच उद्भवलेला कोरोनासारखा महाभयंकर शत्रूशी दोन हात करणाऱ्यांची भल्या माणसाची संख्या मात्र विरळच, असेच एक जीवाची पर्वा न करता मानवतेची उपासना करून लोकांची अहोरात्र काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जितेन्द्र पाटील आहे. रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांच्या संपर्कात राहून जेवणाची व मेडिसिंनची व्यवस्था करणे आणि विशेष म्हणजे कोरोना काळात रोजगार गमावलेल्या लोकांसाठी विविध संस्थांच्या समन्वयातून निधी उभारून अन्न दान करणे यासारख्या कामांसाठी स्व. लोकनेते पप्पु गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान चाळीसगाव यांच्यातर्फे कोरोना योध्दा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, अंबरनाथचे नगरसेवक उमेशदादा गुंजाळ आणि अशोकदादा गुंजाळ (नगरसेवक )मा. श्री प ह भ जळकेकर महाराज ( जळगाव )इतर मान्यवर उपस्थित होते.